आमदार देवेंद्र कोठे यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी एजाज सय्यद यांच्या घरी भेट दिली
सोलापूर: शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष एजाज सय्यद यांच्या घरी भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सय्यद कुटुंबासोबत स्नेहसंवाद साधला आणि उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी भाजपचे युवा कार्यकर्ते एजाज एम. सय्यद यांच्यासह डॉ. इलियास शेख, सोलापूर उर्दूघर सदस्य मेहमूद नवाज सर, शफिउल्लाह काझी, अन्वर काझी, फरहान सय्यद, रियाज सय्यद, फैजान सय्यद आणि अभियंता सादिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी सर्वांना सलोख्याने आणि आनंदाने सण साजरा करण्याचा संदेश दिला.
Leave a Reply