आजपासून शहरातील सिटीबसच्या तिकीट दरात वाढ
महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस तिकीट दरात येत्या १ एप्रिलपासून अल्प वाढ करण्यात आली आहे.
याबाबत परिवहन उपक्रमाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. बस प्रवासाचा टप्पा क्रमांक १ ते ३० पर्यंत किलोमीटर निहाय दराचा तक्ता परिवहन उपक्रमाने जाहीर केला आहे. या अंतर्गत टप्पा एकसाठी दोन किलोमीटर प्रवासासाठी दहा रुपये, टप्पा दोन साठी चार किलोमीटर प्रवासासाठी पंधरा रुपये, टप्पा तीन साठी सहा किमी अंतरासाठी पंधरा रुपये, टप्पा चार साठी आठ किलोमीटर अंतराला वीस रुपये, टप्पा पाच साठी दहा किमी अंतराला २० रुपये, टप्पा सहा साठी १२ किमी अंतराला २५ रुपये, टप्पा सातसाठी १४ किती अंतराला ३० रुपये, टप्पा
आठसाठी १६ किमी अंतराला ३० रुपये, टप्पा ९ साठी १८ किलोमीटर प्रवासाला ३५ रुपये, टप्पा १० साठी २० किमी प्रवासाला ४० रुपये, टप्पा ११ साठी ४० किलोमीटर प्रवासाला चाळीस रुपये, टप्पा १२ साठी २४ किलोमीटर प्रवासाला ४० रुपये, टप्पा तेरा साठी प्रवासाला ४० रुपये, टप्पा १४ साठी २८ किमी प्रवासाला ४५ रुपये, टप्पा १५ साठी ३० किमी प्रवासाला पन्नास रुपये, टप्पा १६ साठी ३२ किमी प्रवासाला पन्नास रुपये, टप्पा १७ साठी ३४ किमी प्रवासाला पन्नास रुपये प्रवासाला तिकीट दर आकारण्यात येणार आहे. टप्पा क्रमांक ३० पर्यंतचे दर या पत्रकात आहेत. टप्पा ३० साठी ६० किलोमीटर प्रवासाला ७५ रुपये तिकीट दर राहणार आहे. हे सर्व दर पूर्ण आकारासाठी असून अर्ध्या आकाराचे दर वेगळे आहेत. पासधारकांनी सुधारित दराचा फरक रोखीने भरून तसा शेरा पासवर घेणे बंधनकारक आहे, असे या पत्रकात नमूद आहे.
Leave a Reply