पोटच्या मुलीने चॉकलेट मागितलं , हैवान बापाने मुलीलाच संपवल
अलीकडे राज्यातील विविध भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अगदी किरकोळ कारणावरून खुनाचे प्रकार घडत आहेत. चॉकलेटसाठी हट्ट धरणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीला नराधम पित्याने गळा आवळून संपवले. लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथील हा प्रकार संतापजनक आहे. आरोपी बापाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील बालाजी बाबु राठोड या व्यक्तीला चार वर्षाची मुलगी आहे. बालाजी हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. रविवारी दुपारी चार वर्षांच्या त्याच्या मुलीने चॉकलेटसाठी हट्ट धरला. त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या बालाजी याने साडीने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला.
आरुषी ही चिमुकली गतप्राण होईपर्यंत बालाजीने साडीचा फास सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने लगेचच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तपासाअंती हा गुन्हा बालाजीनेच केल्यास उघड झाले. उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असतानाच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply