पहिल्याच दिवशी दहा हजार वारकऱ्यांना फोटो मसाजरचा आराम
सोलापूर : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पहिल्याच दिवशीच्या मुक्कामी 9 हजार 485 वारकऱ्यांची फूट मसाजरद्वारे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सेवा केली आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्यात पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजरची मोठ्या प्रमाणात सोय केली आहे. जिल्हा परिषदेचे 140 कर्मचाऱ्यांसमवेत 400 फूट मसाजर पालखी मार्गावर ठेवण्यात आले आहेत. माळशिरस तालुक्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल तोडकरी, अश्वजीत सरवदे, के. पी. शिंदे, विजय रणदिवे, दिलीप पोतलकर, स्वप्निल ढोबळे, आनंद कुलकर्णी, पांडुरंग सुरवसे, आनंद टेके, एन. एम. ननवरे, संग्राम पारसेवार, एस. एम. बारवे, एसपी गव्हाणे, जी.आर. भिडे, डी.डी. निंबाळकर, नितीन सुरवसे या टीम प्रमुखांनी कामकाज पाहिले. या सर्वांना सह नियंत्रण म्हणून अविनाश गोडसे व झहीर शेख यांनी कामकाज केले.
वारकऱ्यांची पडली गर्दी…
माऊलींचा पालखी सोहळा विसावल्यावर फूट मसाजर साठी वारकऱ्यांची केंद्रावर गर्दी पडली. पालखी सोहळ्या बरोबर चालून अनेक वारकऱ्यांचे पाय, गुडघे, पिंढऱ्या दुखत होत्या. या दुखऱ्या पायावर पुट मसाजरचा चांगला परिणाम दिसला. फूट मसाजर वर व्यायाम केल्यामुळे वारकऱ्यांना चांगलाच आराम मिळाला. दुखणे कमी होत असल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी फूट मसाजरसाठी केंद्रावर रांगा लावल्या. त्रास होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुटमसाजरचे सेवा मिळावी म्हणून अनेक भाविक पुढे येताना दिसून आले. माऊली, माऊली या आजोबांना सेवा द्या, असा पुढाकार घेत अनेकजण ज्येष्ठ नागरिकांचे दुखणे हलके करताना दिसून आले. दमलेल्या वारकऱ्यांची सेवा करताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान तरंगले. आषाढी वारी त विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेने कर्मचारी धन्य झाले. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत ही सेवा चालली. मंगळवारी पालखी सोहळ्याचा मुक्काम संपल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला लागले यादरम्यान पहाटेपासूनच पुन्हा फूट मसाजर केंद्रावर रांगा लागल्या अनेक भाविकांनी थकलेल्या पायांना फूटमसाजरची ऊर्जा घेऊन पुढील प्रवास सुकर केला.
अशी झाली सेवा..
माऊलीच्या सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच मुक्कामी वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. यात
धर्मपुरी – 2148
कारूडे – 4878
शिंगणापूर फाटा -840
नातेपुते -1617
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजर सेवा केंद्राच्या कामाची पाहणी केली. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना फूटमसागरचा चांगलाच उपयोग होत असल्याबद्दल अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
Leave a Reply