महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे, १९७२ च्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजनांपासून ते हरितक्रांती, श्वेतक्रांती, पंचायत राज आणि रोजगार हमी योजनेसारख्या धोरणांद्वारे राज्याच्या ग्रामीण भागाला सक्षम करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीत संजय हेमगड्डी, सुभाष चव्हाण, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर अलकाताई राठोड, मा. नगरसेवक विनोद भोसले, भोजराज पवार, मधुकर आठवले, सिद्धाराम चाकोते, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, अरुण साठे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, नामदेव राठोड, बसवराज म्हेत्रे, विजय शाबादी, अनिल मस्के, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, सुभाष वाघमारे, शोभा बोबे, शिवाजी साळुंखे, दिनेश म्हेत्रे, रमेश हसापुरे, ज्योती गायकवाड, चंद्रकांत जाधव, गिरिधर थोरात, रेखा बिनेकर, प्राणेश्वर जाधव, हेमंत जाधव, निशा मरोड, रुकैया बिराजदार, शुभांगी लिंगराज, चंद्रकला निजमल्लू, अंबादास जाधव कवी, मार्ता रावडे, चंद्रकांत टिक्के, बालाजी जाधव, शाहू सलगर, द्रौपदी शिवशरण, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply