बारामती मधील नामांकित कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांची निर्घृणपणे हत्या…
पुणे शहरापाठोपाठ विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला. या प्रकारामुळे बारामती परिसरात मोठी घबराट पसरली आहे.मागील काही दिवसांपासून कोयत्याचं लोन महाराष्ट्रभर पसरलं आहे. ते मागील काही दिवसात बारामतीत पोचले असून,बारामतीतही कोयता अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.बारामती सारख्या शांतता प्रिय शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.याबाबत या घटनेतील अल्पव्य तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली..
Leave a Reply