जालन्यातील सासूचा खून करणारी सून पोलिसांच्या ताब्यात
जालन्यात सासूचा खून करून फरार झालेल्या सूनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील प्रियदर्शनी काॅलनीत भिंतीला डोक आपटून सूनेने सासूचा खून केल्याची घटना घडली होती. हत्येनंतर सासूचा मृतदेह एका गोणीत भरला होता.
मात्र गोणी उचलता आली नसल्यानं सूनेनं मृतदेह तसाच ठेवून फरार झाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सूनेला पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेतले. प्रतिक्षा शिंगारे असं आरोपी सूनेचे नाव आहे, तर सविता शिंगारे असे सासूचं नाव आहे. प्रतिक्षा शिंगारे हिचा पती लातूर येथे एका कंपनीत नोकरी करत असून, सून आणि सासू या दोघीच घरात राहात होत्या. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Leave a Reply