तप्त “शोलापुरात” तापमानाचा पारा ४४ अंश पार; एप्रिलमध्ये २५ दिवस तापमान चाळीशीच्या पुढेच
मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला तापमानाने उच्चांक गाठल्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांची अस्वस्थता आणखी वाढली आहे.
१ एप्रिल रोजी ४०.१ अंश तापमान नोंद झाल्यानतर पुढे चार दिवसाचा अपवाद वगळता पुन्हा तापमानाने डोके वर काढले. पुढे ४२ अंश तापमान ओलांडून ४३ पार केलेला पारा २३ एप्रिल रोजी ४३.८ अंश म्हणजे ४४ अंशांच्या घरात गेला होता. काल महिनाअखेर, ३० एप्रिल रोजी तापमान ४३.६ अंशांवर होते. संपूर्ण एप्रिल महिन्यात वाढत्या उष्म्याने अंगाची लाही लाही झाली असताना पुढे मे महिन्याची सुरुवातही सोलापूर आणखी तप्त होण्याने झाली. ४४.१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान मोजण्यात आल्यामुळे मे महिना ‘अस्वस्थ वर्तमान घेऊन आल्यासारखे सोलापूरकरांना वाटत आहे.
Leave a Reply