कंदलगाव शिवारातील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार सोलापूर ग्रामीण पोलिसांचा छापा, 38 जणांविरुद्ध पोलिसांनी केली कारवाई….

कंदलगाव शिवारातील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार सोलापूर ग्रामीण पोलिसांचा छापा, 38 जणांविरुद्ध पोलिसांनी केली कारवाई….

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंद्रुप-कामती रोडवरील कंदलगाव शिवारातील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार वर छापा टाकून 38 जणांविरुद्ध कारवाई केली असून, अश्लील नृत्य व अवैध धंद्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी पहाटे 12.30 वाजता करण्यात आली. या छाप्यात महिलांसह बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहक अशा 38 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बारमध्ये परवानगीशिवाय अश्लील नृत्य चालवले जात होते. छाप्यात सुमारे ₹ 25 लाखांच्या बनावट नोटा, रोख रक्कम, मोबाईल, वाहने, लॅपटॉप आणि साउंड बॉक्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा तपशील सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. माहिती मिळताच पोलिसांनी पंचसाक्षीदारांसह बारवर छापा टाकला असता, महिला अश्लील हावभाव करत स्टेजवर नाचताना आढळल्या. ग्राहक नकली नोटा उधळून अश्लील मजा घेत होते.

रोख रक्कम: ₹25 लाख 25 हजर 760, ₹1 लाख 23 हजार 500 किमतीचे मोबाईल फोन, ₹1 लाख 80 हजार किमतीची वाहने व इतर साहित्य असा एकूण सुमारे 28 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कारवाईतील आरोपी या प्रकरणात कोलकाता, गुजरात, दिल्ली, बेंगलोर व सोलापूरसह विविध ठिकाणांहून आलेल्या महिलांचा व ग्राहकांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र अश्लील नृत्य प्रतिबंध अधिनियम, तसेच नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पो.उ.नि. राजू डांगे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, जप्त रोख व बनावट नोटांचा स्रोत, महिलांचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि परवानाधारकतेचा तपास सुरू आहे. महिला आरोपींना हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *