सोलापुरात युवा सेनेचे भर पावसात जोडमार आंदोलन !

सोलापुरात युवा सेनेचे भर पावसात जोडमार आंदोलन !
शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट करणार !

मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाला राज्यातील महायुतीचे भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारच जबाबदार असून या शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोलापूर शहर
जिल्हा युवा सेनेच्यावतीने देण्यात आला .


राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सोलापुरात शहर – जिल्हा युवासेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली
तसेच शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी चार हुतात्मा पुतळा येथे भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय भवानी ,जय शिवाजी,या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,भ्रष्ट्र आणि मस्तवाल सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी युवा सेनेचे विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड,युवा सेने कॉलेज कक्ष प्रमुख तुषार आवताडे,अनिरुद्ध दहीवडे,सचिन हेगडे,विजय मोटे,दत्त खलाटे,अविनाश भोळे ,विशाल चोरगे , अक्ष बिराजदार,प्रणित जाधव,राहुल कांबळे,प्रथमेश तपासे,सुभाष सातपुते,वैभव लोंढे,नितीन भोसले,गुरुनाथ शिंदे,विष्णू जगताप.,गुरु बेंद्रे यांच्यासह युवासेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *