पाण्याची टाकी साफ करणं बेतलं जीवावर, सोलापुरात 2 जणांचा श्वास गुदमरुन टाकीतच मृत्यू

पाण्याची टाकी साफ करणं बेतलं जीवावर, सोलापुरात 2 जणांचा श्वास गुदमरुन टाकीतच मृत्यू

Solapur : पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरुन मृत्यू
झाल्याची घटना सोलापुरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सागर नारायण कांबळे या 20 वर्षीय तरुणाचा आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखाण्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघे व्यक्ती गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे.
दुपारी या कामगारांनी टाकी साफ करण्यासाठी अॅसिड टाकलं होतं. त्यानंतर काही वेळाने टाकी साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला असता तो श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याचा प्रतिसाद येतं नसल्याने इतर कामगार देखील खाली उतरते मात्र त्यांना देखील श्वासाचा त्रास होऊ लागला. त्यातून एक कामगार तात्काळ टाकीच्या बाहेर आला दोन जणांना मात्र बाहेर येता न आल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतांना बाहेर काढलं आहे. सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात एका युनिफॉर्म तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीतील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघेजण गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. टाकीत उतरल्यानंतर श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *