प्राथमिक शिक्षण विभाग, विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रशासकीय कामकाज गतिमानता अभियान अंतर्गत विस्तार अधिकारी शिक्षण यांची कार्यशाळा समृद्ध हॉटेल सोलापूर येथे संपन्न झाली.
सदर कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विस्तार अधिकारी यांचे कर्तव्ये, व जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावीत तसेच विस्तार अधिकारी यांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी परिणामकारक ज्ञान समृद्धी असेल तेवढे त्या मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी उपयुक्त असते. विस्तार अधिकारी यांच्यामध्ये सहानुभूती असणे आवश्यक आहे.त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असले पाहिजे.
विस्तार अधिकारी हे प्रशासनाचे कान, नाक,डोळे आहेत. विस्तार अधिकारी यांनी शाळा भेटी करत असताना शुद्ध हेतूने शाळा भेटी करावे असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केले.
तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी विस्तार अधिकारी यांची कर्तव्ये जबाबदारी, पट वाढवणे, विद्यार्थी लाभाच्या योजना, मुख्याध्यापकाचे बैठक घेणे, शालेय व्यवस्थापन कसं करायला हवं, शालेय आरोग्य तपासणी, स्पर्धा परीक्षा नियोजन, पालक भेटी, सत्र परीक्षा,या आदी विषयावरती मार्गदर्शन केले.
तसेच उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी यांनी शाळा भेटी व तपासणी याबाबत सखोल असे मार्गदर्शन व अनुभव कथन केले पुढे बोलताना निंबर्गी म्हणाले सर्व विस्तार अधिकारी यांनी तंत्रस्नेही व्हायला हवं तसेच विस्तार अधिकारी यांनी एका मित्रत्वाच्या नात्याने शाळा भेटी दरम्यान आपण एक रिपोर्टिंग अधिकारी म्हणून काम करावं असे मत व्यक्त केले. तसेच तसेच हरीश राऊत (शिक्षण विस्तारअधिकारी मुख्यालय)यांनी चौकशी प्रकरणे व शासन निर्णय याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले
सदर कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला व नवागत शिक्षण विस्तार अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.
सदर कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी बापूराव जमादार, हरीश राऊत, गुरुबाळ सनके, मल्लिनाथ स्वामी, विकास यादव, आदींनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री सुतार यांनी केले तर आभार बापूराव जमादार यांनी व्यक्त केले
Leave a Reply