मुख्यमंत्र्यांचा फोटो काढून प्रणितींनी लावला स्वतःचा फोटो.. कोणी केला आरोप..पहा
शिवसेना शिंदे गटाच्या राज्याच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. खासदार प्रणिती शिंदे या एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला घेऊन महाराष्ट्रभर विरोध करत आहेत… तर दुसरीकडे आपल्या मतदारसंघात बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो गायब करून स्वतःचा फोटो लावून लाडकी बहीण योजनेचे शिबिर घेत असल्याचा आरोप ज्योतीताई वाघमारे यांनी प्रणिती शिंदेंवर केला आहे.
शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते शोहेब महागामी यांनी 20000 लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहे. मात्र शो हेब महागामी यांनी मतदारसंघात लावलेल्या डिजिटल फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो हटवण्यात आला होता. त्या ऐवजी प्रणिती शिंदे यांचा फोटो लावण्यात आला होता. एकीकडे या योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्या स्वतःचे फोटो लावून मतदारसंघात प्रसार करायचा अशी भूमिका प्रणिती शिंदे घेत असल्याचा आरोप ज्योतीताई वाघमारे यांनी केला आहे.
ज्योतीताई वाघमारे यांनी शरद पवारांवर देखील गंभीर आरोप केले आहे. पहा शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी काय म्हटलं आहे तो व्हिडिओ
Leave a Reply