पहिली बायको मेली, दुसरीशी लग्न केलं तिला अंधारात ठेवून तिसरीला फसविले; डोंबिवलीच्या भामट्याला पोलिसांनी केली अटक..
पहिली पत्नी मेली. दुसरीशी लग्न केले. तिला सुद्धा अंधारात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करुन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. तिने पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णूनगर पोलिसांनी प्रवीण पान्हेरकर या ४२ वर्षीय आराेपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रवीण याने अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
Leave a Reply