सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे मृत मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीला

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मयत मुलींच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी झाल्या दाखल. खासदार प्रणिती शिंदे यांना पाहून मृत मुलींच्या नातेवाईकांनी फोडला हंबरडा. थोड्याच वेळात सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातून निघणार आहे अंत्ययात्रा. बाबू जगजीवनराम झोपडवस्ती बाहेर नागरिकांनी सुरु केलं ठिय्या आंदोलन. पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक करतायत घोषणाबाजी. खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलींना जीव गमावावा लागळ्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. याबाबतीत महापालिकेने लक्ष घालून तातडीने उपाय करावा अन्यथा आम्ही गप्पा बसणार नाही अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे. महापालिका निवडणुका न झाल्याने नगरसेवक आणि महापौर नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ही प्रणिती शिंदे यांनी केला आहे. राजकारण्यांना दंगली सुचतात, मात्र सामान्य माणसाचे प्रश्न कळत नाहीत, याचा निषेध. त्यामुळे सोलापुरात दर दोन दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना मिळाला अशी मागणी ही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *