बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका
बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. बार्शी तालुक्यातील बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना बसला फटका. बोरगाव झाडी गावातील उभे असणारे मकाचे शेत झाले आडवे. शेतकरी अनिल लंगोटे यांचा दीड एकरातील मका झाला भुईसपाट. द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या दीड एकर द्राक्ष बागेला ही बसला अवकाळी पावसाचा फटका. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
Leave a Reply