गोरक्षकाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करुन आर्थिक, मानसिक, शारिरिक छळ करणाऱ्या गोरक्षकावर कारवाई होणेबाबत….
कारणे विनंती भिमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येते की, सोलापूर शहराच्या जवळील नॅशनल हायवे रोडवर रात्री १ ते २.३ च्या सुमारास मध्यरात्री १० ते १२ जण बेकायदेशीरपणे जमाव जमवून कायदेशीर असणाऱ्या महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम १९७६ (२०१५ मध्ये सुधारित) अंतर्गत म्हशी हे अनुसुचीत प्राणी आहे, म्हशी वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करून ड्रायव्हरला मारहाण करून पैसे, मोबाईल काडून घेऊन बेकाखदेशीर रित्या समाजामध्ये काव्दा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करोत आहे. पैसे नाही दिल्यास डायल ११२ नंबरला डायल करून पोलीसांना बोलावण्याची धमकी देतात.
आपल्याला विदित आहे की मुस्लिम समाजाचा धार्मिक सण बकरी ईद काही दिवसांत येत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात शेळ्या, मेंढ्या , म्हशीची वाहतूक बलिदानासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु, आगामी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे आहे. म्हणूनच, आपण आपल्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी, ठाणे, चौक्या व झोनल स्तरावर यांना योग्य सूचना देण्यात यावी व कायदेशीर परवानगी असलेल्या जनावराचौ खरेदी विक्री वाहतूक करताना बेकायदेशीर त्रास देऊ नये असे कायदयाचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकावर कारवाई करण्यात यावी, ही विनंती.
तरी आपण या निवेदनाचा गॉभियर्यापूर्वक विचार करावा.
अशा आशय असं निवेदन देण्यात आला याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देताना भिम शक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीकुमार नागटिळक भीमशक्ती संघटनेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट रियाज शेख वाहिद विजापुरे अझहर शेख दत्ता शिंदे अभि क्षिरसागर आदी उपस्थित होते.
Leave a Reply