मनपा मराठी शाळा क्र. 29 भवानी पेठ, सोलापूर येथे आनंदवारी उत्साहात पार पडली बाल दिंडी
सोलापूर – जय भवानी शैक्षणिक संकुलाच्या पुढाकाराने मनपा मुलांची मराठी शाळा क्र. 29, जय भवानी हायस्कूल, तसेच कन्नड विभाग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आणि पारंपरिक “बाल दिंडी” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली, संत मीराबाई, जनाबाई, वासुदेव, विठ्ठल-रुक्मिणी आदींच्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आकर्षक पालखी वाजतगाजत जय भवानी संकुलातून घोंगडे वस्ती मार्गे निघाली.
हनुमान मंदिर, वस्ती येथे रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यानंतर श्री. गणेश विटकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या गजरात ही दिंडी पुन्हा शाळेकडे रवाना झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ माळी, शिक्षक अरुण डोके, अविनाश हिंगणे, कांचन गोपाळकर, कल्पना शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जय भवानी हायस्कूलचे मुख्याध्यापक झाडकर सर, कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका एन्ट्मनी मॅडम, शिंदे मॅडम, यादव मॅडम, तसेच अनेक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा आनंदवारी सोहळा विद्यार्थ्यांसाठी एक संस्कारात्मक, भक्तिपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव ठरला.
Leave a Reply