खा.प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून आष्टे ते भांबेवाडी येथील रस्ता कामाचे भूमिपूजन
खा.प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातीलआष्टे ,हिंगणी (नि.) या गावांना भेट देऊन गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी सरपंच लक्ष्मीताई शेंडगे, सुभाष मासाळ, महेश गावडे, रमेश नरूटे, कुंडलिक गावडे, लखन घाटे, माजी नगराध्यक्षा सीमाताई पाटील, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, निलेश जरग, राहुल शिवपुजे, वसंत चव्हाण, जीवन पुजारी, भालचंद्र मेलगे पाटील, गणेश शेंडगे, भगवान थिटे, पांडुरंग गडदे, बाबा हरी थिटे, गणेश भिसे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply