टाळ मृदुंगाच्या गजरात कुचन प्रशाला दुमदुमली-
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ,कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे आज वारकरी दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकरी वेशभूषा केली होती. या दिंडीत साक्षरतेचे घोषवाक्य घेऊन नव साक्षरतेचा प्रसार करण्यात आला. बाल वारकऱ्यांच्या हातात असलेल्या टाळाच्या आवाजाने संपूर्ण कुचन प्रशाला दुमदुमली . प्रशालेच्या सहशिक्षिका कविता गेंगाणे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर प्राचार्य युवराज मेटे , सर्व अधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे आरती करण्यात आली. त्यानंतर प्रशालेच्या सहशिक्षिका माने यांनी मार्गदर्शन केलेले टाळ नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले. तसेच हातात पताका घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा सादर केला यामध्ये विद्यार्थ्यांनी फुगडीचे वेगवेगळे प्रकार, पाऊल असे विविध वारकरी खेळ सादर केले. यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांनी मार्गदर्शन केले. सहशिक्षिका माधूरी कुलकर्णी मॅडम व स्वप्ना मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिंडीचे महत्त्व व माहिती सांगितली. या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु ,प्रणिता सामल ,मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
Leave a Reply