कुसुरच्या न्यू इंग्लिश स्कूलचे पुष्पा लोणी ‘एकलव्य’ पुरस्काराने सन्मानित..
रयत शिक्षण संस्थे कडून दर वर्षी गरीब , निरीक्षर पालक असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार दिला जातो. सन २०२३-२४ चा हा पुरस्कार सोलापूर,सातारा जिल्ह्यातील १२९ शाळांमधून तीन शाळेतील विद्यार्थ्यांना दिला गेला. त्यातून न्यू इंग्लिश स्कूल कुसुर विद्यालयातील एस एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कु. पुष्पा तुकाराम लोणी हीची निवड झाली. तिच्या या निवडीबद्दल कुसूर खानापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
कुसूर, दक्षिण सोलापूरच्या भीमा नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गावातील पुष्पा तुकाराम लोणी या न्यु इंग्लिश स्कूल कुसुर येथील विद्यार्थिनीला एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण गावातून आनंदाचा वर्ष होत आहे
या पुरस्कारासाठी शाळेचे मुख्याध्यापिका चंद्रकला भोरे दत्तात्रय पवार, देवानंद महामुनी, सचिन पाटील, भिमाशंकर सोनागे, रशीद चाचा, स्थानिक स्कूल समितीचे बाळाप्पा नांगरे मामा , विंचुरे आणि सोसायटीचे चेअरमन सुनील नांगरे यांनी पुष्पाच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply