सोलापूरसह राज्यात तीव्र उष्णतेची लाट वाढणार……..
मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख वर चढत आहे. सूर्य तापल्यामुळे सोलापूरसह अनेक शहरांमध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतामध्ये ढगाळ हवामान आहे. पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई, उपनगर आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी गारपिटीचे संकट कायम आहे.
राज्यात उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानामध्ये किमान वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सोलापूर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या शहरांचे तापमाळ चाळीस अंशांपलीकडे गेले आहेत.
राज्यातील अकोला शहरात 43.2 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद धाली आहे. राज्यात पुढील दोन ते चार दिवसांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिसने वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Leave a Reply