सावधान! पीएम किसानची फाइल डाऊनलोड केली; सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदाराचा मोबाइल हॅक; ‘ही’ बाब झाल्याने घटना उघडकीस

व्हाटसअॅपवर चुलत भावाकडून आलेली अॅप फाइल तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मोबाईल फोनवर इन्स्टॉल केली. त्यानंतर तत्काळ त्यांचा मोबाइल हॅक झाला.
व्हाटसअॅप ऑटोमॅटिक लॉगआऊट
व्हाटसअॅप ऑटोमॅटिक लॉगआऊट झाल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. तोवर त्यांच्या मोबाइलवरून शेकडो जणांना ती फेक फाइल ऑटोमॅटिक फॉरवर्ड झाली होती. त्यामुळे अनेकांचा मोबाइल हॅक झाला.
काल शुक्रवारी रात्री तहसीलदार पाटील यांच्यासह मोबाइल हॅक झालेल्या कर्मचाऱ्यांनी सायबरकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. तसेच सायबर कक्षाकडे जाऊन त्याबाबत तक्रार नोंदवली.
तत्काळ मोबाइल फोनमधून त्यांनी सिम कार्ड काढले
पीएम किसान योजनेची फाइल इन्स्टॉल केल्याने तहसीलदार श्रीकांत पाटील व गौण खनिज विभागातील सोमय्या स्वामी यांचे मोबाइल हॅक झाले. लक्षात येताच तत्काळ मोबाइल फोनमधून त्यांनी सिम कार्ड काढले. (स्रोत: दिव्य मराठी) फाइल इन्स्टॉल करू नये
माझ्या व्हाटसअॅपवर चुलत भावाकडून पीएम किसान योजनेची फाइल आली. ती मी डाऊनलोड केली. त्यातून इन्स्टॉल करण्याचा मेसेज आला. त्यानुसार इन्स्टॉल केली. त्यानंतर मोबाइलच हॅक झाला. तोवर अनेकांना तीच फाइल फॉरवर्ड झाली होती. त्यासंबंधी तक्रार सायबरकडे नोंदवली आहे. ज्यांच्याकडे फाइल आली आहे त्यांनी ती इन्स्टॉल करू नये. – श्रीकांत पाटील, तहसीलदार
Leave a Reply