द सोलापूर तालुक्यातील वडजी येथील ग्रामदैवत खंडोबा देवाच्या यात्रेस 3 तारखेपासून प्रारंभ
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेस 3 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली.
मार्गशीर्ष महिन्यास सटीचा महिना म्हणून ओळखले जाते.
या सटीच्या महिन्यांतच महाराष्ट्र राज्यातील श्री खंडोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ होतो
त्याच अनुषंगाने 3 नोव्हेंबर 2024 पासून वडजीचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ झालेला होता
यात्रेच्या प्रारंभी दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते
वडजीच्या खंडोबा देवाच्या यात्रेस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी असते.
या संपूर्ण यात्रेसंदर्भात गावचे पोलिस पाटील निवृत्ती लेंगरे आणि गावचे माजी उपसरपंच राम भागवत यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्युज चॅनल शी बोलताना दिली.
आज शनिवार रोजी संपूर्ण वडजी गावांसह पंचक्रोशीतील भाविकांची नैवैद्य दाखविण्यासाठी खंडोबा मंदिर परिसरात सकाळ पासून भाविकांची मोठी गर्दी होती.
या यात्रेस सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे ही विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ मंडळीसह पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply