सोलापूरात बेकायदा सावकारी करणाऱ्या एका महिलेवर पोलीसात गुन्हा दाखल..

सोलापूरात बेकायदा सावकारी करणाऱ्या एका महिलेवर पोलीसात गुन्हा दाखल..

सोलापूरात बेकायदा सावकारी करणे एका महिलेस पडलं महागात

 

करणाऱ्या हगलूर येथील महिलेवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारी अर्जा वरुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून धाड टाकून ही कारवाई करण्यात आली याबाबत उपनिबंधक कार्यालयाच्या लिपिक तथा पथक प्रमूख प्रिया संकद यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बेकायदेशीर सावकारी प्रकरणी राणी मोहन
जाधव रा. हगलूर ता उत्तर सोलापुर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समर्थ दशरथ शिंदे यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सोम वारी सकाळी राणी जाधव यांच्या घरात धाड टाकण्यात आली. या धाडीत बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी कागदपत्रे आढळून आली. तक्रारदाराचे वडिल कै. दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले ५० रुपयांचे दोन स्टँप पेपर, व्याजाच्या नोंदी असलेले नोंद वहया असे दस्तऐवज आढळून आली. श्रीमती राणी मोहन जाधव या अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रिया संकद, सहाय्यक ए. एस.पुजारी, विक्रम गौड, एस. बी. कासार यांच्या पथकाने हगलूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या राणी मोहन जाधव (रा. हगलूर) यांच्या निवासस्थानी सोमवारी पोहचून घराची झडती घेतली. यामध्ये रि दस्तऐवज सापडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *