ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूरचे डिपेक्स 2025 मध्ये घवघवीत यश….

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूरचे डिपेक्स 2025 मध्ये घवघवीत यश….

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूरचे डिपेक्स 2025 मध्ये घवघवीत यश….

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्ट यांच्याद्वारे मुंबई येथे आयोजित 34 व्या डिपेक्स 2025 प्रदर्शनात सोलापूरच्या ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश मिळविले.


या प्रदर्शनात राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक अविष्काराला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त होत असते. विद्यार्थ्यांच्या नवनवीन अविष्कारांना मंच उपलब्ध करून देणे, नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविणे हा सदर प्रदर्शनामागचा मुख्य हेतू असतो. सदर प्रदर्शनात ए. जी. पाटील तंत्रनिकेतन मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी यांनी प्राध्यापक श्रीकांत बोगा यांच्या मार्गदर्शनाखाली “आटोमॅटिक झेब्रा ब्रिज फॉर रेल्वे प्लॅटफॉर्म ” हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पास डिपेक्स 2025 मधील “संस्टेनेबल सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर” या विभागांतर्गत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या महाविद्यालय स्तरावरील डिपेक्सचे मुख्य समन्वयक म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक कृष्णकांत साळुंखे यांनी काम पाहिले व विशेष परिश्रम घेतले.

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या डिपेक्स 2025 मधील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर ए. पाटील, उपाध्यक्ष शिवानंद सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य एस के मोहिते, व सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख नितीन पवार यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व विभाग प्रमुख यांचे कौतुक केले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *