हातोला येथील गोल्हार नाकाडे लग्न सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दुग्ध अभिषेक
आष्टी तालुक्यातील हातोला येथील निवृत्ती गोल्हार यांचे चि.अमोल. व संजय नाकाडे यांची कन्या अश्विनी यांचा शुभविवाह आज संपन्न झाला यावेळी नवरदेव अमोल व नवरी अश्विनी यांनी लग्न प्रसंगी बहूल्याववर चढण्या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा सोबत घेऊन लग्न मंडपात प्रवेश केला .
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करत त्यांना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची शक्ती मिळो आम्ही सर्व भारतातील नागरिक आपल्या पाठिंशी खंबीरपणे उभा आहोत हा संदेश या लग्न सोहळ्यातून दिला आहे.यावेळी आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी या नवरदेव नवरीची मोठे कौतूक केले व पाकिस्तानला खायला अन्न नाही तरी देखील कुरापती केल्या शिवाय राहात नाहीत आपण सर्वांनी मोदींच्या माघे खंबीरपणे उभा आहोत असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.
Leave a Reply