सिध्देश्वर तलावाचा सौंदर्य धोक्यात,तलावाचा पाणी दूषित, मासे व कासवाच्या दुर्दैवी मृत्यू
पुण्य नगरी सोलापूरचा सौंदर्य म्हणजे सिध्देश्वर तलावाचा चित्र पटकन लक्षात येत. पण ह्याच सिध्देश्वर तलावाची चर्चा रंगू लागली आहे मागील अनेक दिवसांपासून सिध्देश्वर तलावातील मासे व कासव अश्या मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. सिध्देश्वर तलावाचा पाणी हा पुर्ण पणे दुषीत झाल्याने मासे व कासव जातीचा नायनाट होताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा मासे मरून दुषीत पाण्यावर तरंगताना दिसून येतात पण अद्याप प्रशासन या गोष्टीवर कुठलीच उपाय योजना केली नसल्याचे ही दिसून येत आहे. सिध्देश्वर तलावाचा पाणी दूषित का होतंय. दुषीत होण्या मागचे कारण काय आहेत हे जाणून घेण गरजेचे आहे पण प्रशासन सालानाबाद प्रमाणे यंदाही वेळ मारून नेणार अशीच चिन्ह सध्यातरी दिसत आहेत.
पुण्यनगरी सोलापूर शहराचा सौंदर्य असणारा सिध्देश्वर तलावाचा पाणी दूषित होवून मृत माश्याचा खच व दुर्मीळ जातीचे कासवाचा मृतदेह पाहून सोलापूरच्या सौंदर्याला तडा जाणार की काय असी चिंता ही व्यक्त होत आहे. दुषीत पाणी. पाण्यावरील हीरवळी, त्थाच बरोबर मासे, कासव तसेच अनेक प्राणी तलावा लगत असतात त्यांच्या भवितव्याचा विचार करून लवकरच प्रशासन योग्य पाऊल उचलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Leave a Reply