सोलापूर भाजपमधील वाद अत्यंत टोकाला गेल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
सत्ताधारी भाजपचे आमदार एकमेकांना बोलणे तर सोडाच पण समोरासमोर येत नसल्याचे राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या दौऱ्यात प्रकर्षाने जाणवले. जोपर्यंत आमदार विजयकुमार देशमुख हे राणे यांच्यासोबत होते, तोपर्यंत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंत्र्यांकडे जाणे टाळले. मंत्री राणे जेव्हा कल्याणशेट्टी यांना भेटण्यासाठी सुधीर थोबडे यांच्या घरी गेले, त्यावेळी देशमुखांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कल्याणशेट्टी आणि राणे हे दोघे एकाच गाडीतून सांगोल्याला गेले. मात्र, सोलापूर भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र स्वरूप घेताना दिसत आहे.
मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर बाबा कादरी आणि पंजाब तालीम घटनेतील पीडित हिंदू कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. मंत्री राणे हे गुरुवारी (ता. 05 जून) सकाळी अकराच्या सुमारास पीडितांच्या घरी भेटायला आले. या भेटवेळी राणे यांच्यासोबत शहरातील एकही आमदार नव्हता. शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे हिरेहब्बू यांच्या वाड्यात मंत्री राणे यांची वाट पाहत थांबले होते. पीडितांच्या भेटीनंतर राणे यांनी वडार गल्ली येथील अय्या गणपतीची आरती केली.
Leave a Reply