कासेगावात पती पत्नीसह मुलांची आत्महत्या
घरगुती भांडणातून पत्नीने मुलासह विहीरीत मारली उडी तर पतीने घेतला गळफास
पंढरपूर कौटुंबिक वादातून पत्नीने लहान मुलासह विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही माहिती समजताच पतीने देखील घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपावली आहे. ही घटना दि. 6 जुलै रोजी ऐन आषाढी एकादशी दिवशी कासेगाव (ता.पंढरपूर) येथे घडली आहे. या घटनेत अख्खे कुटुंब संपले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे (वय 25), सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत दुपारी 2.30 वा. उडी मारुन आत्महत्या केली आहे. शेतात गेलेली मोनली व मुले बराच वेळ झाले तरी घरी आली नसल्याने पती म्हमाजी व कुटुंबिय शोधण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीच्या काठावर चपला दिसून आल्या. तेव्हा मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सोमवारी पहाटे चार वाजता पती म्हमाजी शहाजी आसबे (वय 35) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन त्या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू आहे. आत्तापर्यंत फक्त 4 वर्षांचा मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडला आहे. तर बाकीचे मृतदेह रात्री उशिरा शोधण्यात एनडीआरएफ ला यश आले.पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. म्हमाजी आसबे याच्या पाश्चात केवळ आई वडीलच राहिले आहेत. अख्ख कुटूंब संपले आहे.
म्हमाजी आसबे यांची कासेगाव येथे शेती आहे. त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली आहे. या घटनेने, कासेवागात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply