Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या…। मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या…। मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Reliance Retail Exchange Festival: जर तुमचे बहुतेक कपडे जुने झाले असतील आणि तुम्ही नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलने एक खास योजना आणली आहे.
या नवीन योजनेचे नाव ‘फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिव्हल’ आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमचे जुने किंवा ब्रँड नसलेले कपडे एक्सचेंज करु शकता आणि आकर्षक सवलतीत नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करु शकता. श्रावण महिना आणि येणान्या सणांच्या मुहूर्तावर हा खास महोत्सव सुरु करण्यात आला आहे, जेणेकरुन ग्राहकांना सणांच्या निमित्ताने परवडणाऱ्या किमतीत नवीन कपडे खरेदी करता येतील.
ही ऑफर कुठे आणि कधीपर्यंत उपलब्ध असेल
दरम्यान, ही ऑफर देशभरातील सर्व रिलायन्स (Reliance) ‘फॅशन फॅक्टरी’ स्टोअर्समध्ये 20 जुलैपर्यंत वैध असेल. ‘फॅशन फॅक्टरी’ आधीच त्यांच्या मोठ्या ब्रँड्सवर मोठ्या सवलती देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आता या एक्सचेंज फेस्टिव्हल अंतर्गत तुम्ही जुने कपडे देऊन नवीन बँडेड कपडे खरेदी करु शकता. या कपड्यांवर एक्सचेंज उपलब्ध असेल
तुम्ही तुमचे जुने डेनिम शर्ट, टी-शर्ट किंवा मुलांचे कपडे फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्ये आणून एक्सचेंज करु शकता. त्या बदल्यात तुम्हाला स्टोअरकडून एक्सचेंज व्हाउचर दिले जातील, ज्याची किंमत खालीलप्रमाणे असेल. डेनिमच्या बदल्यात 400 पर्यंतचे व्हाउचर
शर्टच्या बदल्यात – 250 पर्यंतचे व्हाउचर
टी-शर्टच्या बदल्यात 150 पर्यंतचे व्हाउचर
मुलांच्या कपड्यांच्या बदल्यात – 100 पर्यंतचे व्हाउचर
तसेच, दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू खरेदी करताना किंवा नवीन ब्रँडेड
कपडे खरेदी करताना तुम्ही हे व्हाउचर वापरु शकता.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *