बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या


पुणे : मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणते, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. जैनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. कुंटणखाना मालकीण व तिचा भाऊ हे वेश्यावस्तीत येणाऱ्या ग्राहकांना तसेच महिलांना मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. नंतर आता मुंबईहून आलेल्या एकाला पकडण्यात आले आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *