कल्याणमध्ये भर चौकात तरुणावर चाकू हल्ला; आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी केली अटक
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बैलबाजार चौकात भरदिवसा एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव अरुण तिवारी आहे. त्वरीत घटनास्थळी दाखल होत महात्मा फुले पोलिसांनी आरोपी अरुण तिवारीला अटक केली आहे. ज्याच्यावर हल्ला करण्यात आला, त्या तरुणाचे नाव दिलीप चौधरी आहे. फिर्यादी दिलीप चौधरी याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. यानंतर फिर्यादीचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.
Leave a Reply