मुलींनी स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो मार्शल आर्टचे घ्यावे

मुलींनी स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो मार्शल आर्टचे घ्यावे

मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घ्यावे. महाविद्यालय असो किंवा समाजात वावरताना स्वतःच्या संरक्षणासाठी तत्पर राहावे, असे आवाहन मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले.ते मंद्रुप
येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती आयोजित महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव एम.डी. कमळे होते. तर प्रमुख उपस्थिती संस्था उपाध्यक्ष डॉ.सी.जी. हविनाळे, महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जवाहर मोरे , गोपनीय विभागाचे सागर चव्हाण, तायक्वांदो ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांची उपस्थिती होते.
पुढे बोलताना मनोज पवार म्हणाले की, मुलींना हात, पाय, केसातील पिना, पेपर स्प्रे व ओढणी यांच्या सहाय्यानेही संरक्षण करता येते. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी तायक्वांदो , कराटे अशा उपक्रमामध्ये भाग घ्यावा. स्वतःचे रक्षण स्वतः करावे व मुलीने चोवीस तास तत्पर राहून स्वतःचे स्वंरक्षण कसे करता येईल यासाठी मार्शल आर्टचे धडे शिकावे. यावेळी डॉ सी जी हविनाळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षपदावरुन बोलताना एम डी कमळे म्हणाले की, अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण सर्व मुलींनी घ्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा बी एस कोरे यांनी केले, सूत्रसंचालन कु सदफ शेख हिने केले तर आभार समिती समन्वयक डॉ.ज्योती नादरगी यांनी मानले.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *