उत्तर सोलापूर नान्नज येथे ४०० शर्वरीच्या रोपांची चोरी..
सोलापूर-बार्शी महामार्गावरील नान्नज
शिवारातील ३०० ते ४०० शर्वरीच्या रोपांची चोरीला गेली. याप्रकरणी चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस ३०३ (२) नुसार सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, सुहासिनी नंदकुमार बोराडे (वय ५२, रा. प्लॅट नंबर ६०४, नाथ संकुल अपार्टमेंट, सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल बाळू कोरे (वय ३०), बाळू कोरे (वय ३५), विनोद बसू कोरे (वय ३५), महादेवी बाळू कोरे (वय ४५) या
मोहितेवाडीच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, १५ एप्रिल २०२५ ते १ मे २०२५ या कालावधीत सायंकाळी ७ वाजण्याच्या नान्नज येथील शेती गट नंबर ७९३ मधील शेतातील शर्वरीची ३०० ते ४०० झाडे चौघांनी संगनमत करून चोरून नेले. या घटनेनंतर फिर्यादीने आजूबाजूच्या शेतात पाहणी केली असता ते मिळून न आल्याने पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत
Leave a Reply