अक्कलकोट वागदरी येथे सुट्ट्या पैशाच्या कारणावरुन महिला वाहकास मारहाण

अक्कलकोट वागदरी येथे सुट्ट्या पैशाच्या कारणावरुन महिला वाहकास मारहाण

महिला आरोपीची तुरुंगात रवानगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे एसटी बसच्या महिला वाहकास एका महिला प्रवाशाने सुट्टे पैशाच्या कारणावरून मारहाण केली आहे.
याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात
शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल् करण्यात आला आहे. सदर आरोपीने जामीन नाकारल्याने तुरुंगात रवानगी करण्यात आले आहे.
फिर्यादी अश्विनी राजेश वडजे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुपाली राजेंद रणदिवे (रा. केम, ता. करमाळा) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी वडजे या अक्कलकोट ते उमरगा बसवर कर्तव्यावर असताना चालक म्हणून गोविंद इंगळे हे होते. बस (एमएच १४ बीटी ३२६५) मधील सर्व प्रवाशांचे तिकीट काढून बस निघाली होती. रुपाली रणदिवे ही त्या बसमध्ये प्रवास करीत होती. तिकीटांचे सुट्टे पैसे देण्यासाठी नव्हते म्हणून तिला थांबा आल्यानंतर राहिलेले पैसे परत करते, असे सांगितले. बस वागदरी येथील स्थानकावर आली असता तेथे प्रवाशी बसमधून उतरुन आपल्या तिकीटांचे राहिलेले पैसे घेण्यासाठी वाहकाकडे आले. त्यातील काही प्रवाश्यांना त्यांचे उरलेले पैसे परत केले. त्यातील दोन महिलांना त्यांचे पैसे आपसात घेण्यासाठी दिले असता आरोपीने मी इतरांना पैसे का मागू, मी तुम्हाला पैसे दिले आहेत, माझे उरलेले सुटे पैसे मला तुम्हीच परत द्या, असे म्हणून जोरजोरात मोठ्याने बोलू लागली. त्यावेळी रणदिवे हिने वाहकाच्या अंगावर येऊन ड्रेस ओढून फाडला व शिवीगाळ करत पायातील चप्पल काढून मारहाण करुन जखमी केले आहे. याप्रकरणी रणदिवे हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *