सोलापूरच्या विकासाला नवे पंख…! होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू;

सोलापूरच्या विकासाला नवे पंख…! होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू;

सोलापूरसह धाराशिव व लातूर जिल्ह्याच्या किमान एक कोटी लोकांवर होणार सकारात्मक परिणाम

सोलापूर | ०९ जून २०२५

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेअंती नागरी विमानसेवा सुरू होणार असून, हा ऐतिहासिक क्षण सोलापूर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन घडवणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सेवेमुळे सोलापूर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील किमान एक कोटी नागरिकांचे जीवनमान आणि संधींची व्याप्ती यामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे.

✅ सर्वांगीण विकासाची नवी दिशा

ही विमानसेवा केवळ प्रवासाचा एक पर्याय नाही, तर ती औद्योगिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

औद्योगिकदृष्ट्या, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील उद्योजकांना देश-विदेशातील गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधता येणार असून, लॉजिस्टिक्सचा खर्च व वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

धार्मिक पर्यटनासाठी, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, औसा, आणि उस्मानाबाद सारखी श्रद्धास्थाने देशभरातील भाविकांसाठी अधिक सुलभ व सहज पोहोचण्याजोगी होतील. सांस्कृतिकदृष्ट्या, या भागातील कला, लोकसंस्कृती, हस्तकला, आणि खाद्यपरंपरा देशभर पोहोचण्याची संधी मिळेल.

सामाजिकदृष्ट्या, शिक्षण, आरोग्य व नोकरीच्या संधींसाठी मोठी मदत होईल. ग्रामीण भागातील युवक-युवतींना मोठ्या शहरांत प्रवासासाठी एक सशक्त पर्याय मिळेल.

✈ विमानसेवेमागील संघर्ष आणि सोलापूर विकास मंचचे योगदान

या ऐतिहासिक घडामोडीमागे सोलापूर विकास मंचाचे अथक व निरंतर प्रयत्न आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मंचच्या सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा, जनजागृती, प्रशासनाशी बैठकांद्वारे हा प्रकल्प शक्य केला आहे. केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, DGCA, आणि विमान कंपन्यांशी सलग संपर्क ठेवून हा प्रकल्प साकार करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
आज सोलापूरकरांना स्वप्नवत वाटणारी विमानसेवा प्रत्यक्षात उभी राहिली, याचे सर्व श्रेय या टीमच्या जिद्द आणि निष्ठेला जाते.

💻 आता पुढचे ध्येय – सोलापूरमध्ये आय.टी. पार्क

सोलापूरसाठी ही केवळ सुरुवात आहे. सोलापूर विकास मंच आता पुढचे ध्येय ठरवले आहे – सोलापूरमध्ये आय.टी. पार्क मंजूर करून घेणे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता मिळवून टि.सी.एस, इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमीनी सारख्या मोठ्या आय.टी. कंपन्यांचे युनिट्स सोलापुरात स्थापन करणे, हे पुढचे पाऊल आहे. यामुळे सोलापूरच्या हजारो तरुणांना त्यांच्या गावातच उच्च दर्जाच्या नोकऱ्यांच्या संधी मिळणार आहेत, आणि स्थलांतर रोखता येणार आहे. थोडा संघर्ष आहेच, पण जसा विमानसेवा सुरू केली, तसंच हे स्वप्नही सत्यात उतरवणारच!

🌟 शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…

“स्वप्न बघणं पुरेसं नाही, त्यासाठी संघर्ष आणि कृती आवश्यक असते. सोलापूर विकास मंचने हे दाखवून दिलंय. आता सोलापूरच्या प्रगतीला कुणीही थांबवू शकत नाही!”

✍ विजय कुंदन जाधव
सदस्य
सोलापूर विकास मंच
‪+91-9673337988‬

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *