पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद
पाणी संघर्ष समिती दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्याचे उपोषण करते श्री गौरीशंकर बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत
जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर साहेब पंढरपूर दौऱ्यामध्ये असल्यामुळे त्यांची आज भेट होऊ शकली नाही परंतु उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन विभाग) आदरणीय सुशांत बनसोडे साहेब यांनी निवेदन घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लगेचच शिष्टमंडळ सिंचन भवन येथील लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाचे सन्माननीय खांडेकर साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले. त्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता उजनी कालवा,( विभाग क्रमांक- 8) चे आदरणीय कोंडेकर साहेब यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आले.सन्माननीय कोंडेकर साहेबांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने चालू असल्याचे सांगितले …जोपर्यंत शिरवळचे धूबधूबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो होत नाही ,,,तोपर्यंत पंप बंद न करण्याचे शंभर टक्के हमी दिली…तरीही साहेबां समोर शिरवळ तलाव भरत असताना मध्येच पंप जर बंद झाले तर पुनश्च एकदा आमरण उपोषणास शिरवळ येथील ग्रामपंचायत समोर बसणार असल्याचे गौरीशंकर बिराजदार यांनी सांगितले.
यावेळी, इंगळगी गावचे युवा नेते,मा मौलाली शेख,महादेव बिराजदार, कूलप्पा पाटील,जोतेपा पूजारी माजी ग्रामपंचायत मेंबर, बापूराव पाटील,दयानंद सुसलादी( शिरवळ),मा श्रीशैल समदुरले मधगोंडा पुजारी,शिवराज अक्कलकोटे (कणबस) आधी शेतकरी बांधव उपस्थित होते
Leave a Reply