मुंबई – हैदराबाद एक्स्प्रेस मध्ये केम जेऊर दरम्यान भाळवणी नजीक रेल्वेवर दगडफेक; एक प्रवाशी जखमी
मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वेवर अज्ञाताने दगडफेक करून प्रवाश्यांना जखमी केल्याची धक्कादायक प्रका घडला असून यात हकीकत अशी की मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वे केम जेऊर येथील भाळवणी नजीक येताच रेल्वेतील प्रवाश्यांवर अंधाधुंध दगडफेक झाली या दगडफेकीत प्रवास करीत असलेल्या विजय कुमार योगी व राहुल नाईक त्याच बरोबर लक्ष्मी वडत्यावत ही महीला प्रवासी जखमी झाली आहे. रेल्वेतील सुरक्षा रक्षकांनी प्रवाश्यांना खिडक्या व दार बंद करण्यासाठी सुचीत केला गेला होता पण प्रवाश्यांनी लक्ष दिला नसल्याचेही समजते. दगडफेकीतील जखमी प्रवाश्यांवर कुर्डुवाडी येथे रेल्वे थांबवून प्रथमोपचार करण्यात आला असल्याची माहीती ही समोर आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
Leave a Reply