पार्टीच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या;
शिवाजीनगर पोलिसांनी १२ तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या
पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बारकू पाडा परिसरात तुषार देडे हा १८ वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले. या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी आणि तुषार देडे यांच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या तुषार देडे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची अवघ्या १२ तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे.
Leave a Reply