बोगस औषध प्रकरण: तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…………
तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा- सुषमा अंधारे
बीडच्या आंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बोगस औषध गोळ्या पुरवठा संदर्भात तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, व राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच या दोन्ही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करु नये असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या आहेत. तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जी टेंडर प्रक्रिया पारित केली त्यानुसार जी बनावट औषधे खरेदी केली ती ज्या कंपनी कडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टीफाईड करण्याचे काम हे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय करते. या अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोणतीही तपासणी न करता, अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात आहे की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टीफाईड केले आणि त्याच्या आधारावार तानाजी सावंत यांनी क्रॉस चेक न करता, पारंपारिक औषध खरेदीची प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आणि अन्न व औषध खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी केली ही तानाजी सावंत यांची चूक आहे. या प्रकरणात सभागृहाच्या आत तसेच वेळ आली तर सभागृहाबाहेर रस्त्यावरची लढाई लढू अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
Leave a Reply