Solapur…नितेश राणे वर मास्तर संतापले पुनम गेड समोर शेकडो महिलांची गर्दी

Solapur…नितेश राणे वर मास्तर संतापले पुनम गेड समोर शेकडो महिलांची गर्दी

सोलापूर……..माजी आमदार आडम मास्तर ऑन नितेश राणे नितेश राणे खूप छोटा माणूस त्याला कमी अनुभव;इंदिरा गांधी सारख्या नेत्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतंनितेश राणेंच्या वक्तव्यावर माजी आमदार नरसय्या आडम भडकले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीला आल्यावर त्यांचा ताफा अडविणार

सोलापूर:राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे भाषण करताना कुणीही कितीही नाचला उड्या मारल्या तरी तुमचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री फडणवीस आहेत.राणेंच्या या विधानांने राज्यात महायुतीमधील नेते नाराजी व्यक्त करत आहेत.सोलापूर मधील माकपचे माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.नितेश राणे हा अतिशय छोटा माणूस आहे.त्याला काहीच अनुभव नाही.देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीना जनतेने सत्तेतून बाहेर काढले होते.नितेश राणेंच्या अशा वक्तव्याकडे लक्ष देऊ नका असे माजी आमदार आडम मास्तर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

*जय श्री राम म्हणणारा तो भाजप आमदार कुठंय-
माकपचे माजी आमदार व कामगार नेते आडम मास्तर हे बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी विक्रेत्यांना घेऊन आंदोलन करत होते.त्यावेळी आडम मास्तर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदें व भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरही टीका केली आहे.हे सर्व भाजी विक्रेते सोलापूर शहरमध्य विधानसभा क्षेत्रातील आहेत,तेथील भाजप आमदार निवडणूकीच्या काळात जय श्री राम अशा घोषणा देत निवडून आले आहेत तर भाजी विक्रेत्यांसाठी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे वेळ नाही का असा सवाल आडम मास्तर यांनी उपस्थित केला आहे.

*भाजी विक्रेत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार-
माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.आषाढी वारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला येणार आहेत.मी सर्व भाजी विक्रेत्यांना सोबत घेऊन विमानतळावर जाऊन त्यांचा ताफा अडविणार आहेत.पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना मी घाबरत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आडम मास्तर यांनी दिली आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *