पुण्यात घरगुती गणपती समोर साकारलाय मनोज जरांगे पाटलांचा देखावा

पुण्यात घरगुती गणपती समोर साकारलाय मनोज जरांगे पाटलांचा देखावा

पुण्यातील एका पुणेकरांने आपल्या घरातील बाप्पा समोर मराठा आरक्षणाचा देखावा तयार केला आहे. या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय गुरुवार पेठेतील आपल्या घरी किरण चव्हाणांनी हा देखावा तयार केला आहे.

पुण्यातसह राज्यभारात सध्या गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतीये, पुण्यातल्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते ते गणेशोत्सवातले देखावे. पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर घरातले गणेशोत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात, असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय. ज्या व्यक्तीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण ढवळून निघाले त्या मनोज जरांगे पाटलांचा देखावा त्याचा आंदोलनाचा सगळा प्रवास या देखाव्यातून या ठिकाणी सादर करण्यात आलाय. अगदी मनोज जरांगे जेव्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते ते ज्या पद्धतीने उपोषण करायचे त्यांची रचना कशी होती, हे सर्व या देखाव्यामध्ये साकारण्यात आलयं. मग त्यामध्ये अंतरवाली सराटीचे ते मंडप असेल तो स्टेज असेल छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती असेल ते लोकांची बसण्याची पद्धत असेल हे सगळ या देखाव्या मध्ये सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि राज्यभरात होणारे मनोज जरांगेंचं जंगी स्वागत त्यांचा राज्यभर काढण्यात आलेला दौरा, त्यांचा कॉनवा जेसीपी मधून होणारे स्वागत हे देखील या देखा  व्यामध्ये चव्हाण यांनी दाखवला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *