सिध्देश्वर मार्केट यार्डात आज सूकसूकाट….
सोलापूर शहरातील सिध्देश्वर मार्केट यार्डात आज सूकसूकाट दिसून आला तर मार्केट यार्डातिल सर्वच दूकानांना आज टाके दिसून आले. माथाडी कामगारच कामावर नसल्याने कोणत्याही व्यवहार झाले नाहीत. संबंधित बाजार समिती प्रशासकीय कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय, या प्रशासकीय कार्यालयांना यासंबंधीचे पत्रव्यवहार करून कामबंद आंदोलन करण्यासंबंधी कळवण्यात आले होते. संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरून याबाबत चर्चा आणि बैठक संपन्न झाली. त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेऊन सदरचे कामबंद आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी संयुक्त समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कामबंद आंदोलनात सहभागी संघटना
*माता रमाई संघटना
*माथाडी कामगार विकास मंडळ
*फ्रुट कामगार संघटना
*लाल मिरची कामगार संघटना
*माथाडी कामगार संघ
टप्पा दुरुस्ती मागणी ही न्यायप्रविष्ठ बाब..
हमाल माथाडी माथाडी कामगारांच्या टप्पा दुरुस्तीची मागणी ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. यामध्ये जिल्हा उप निबंधक कार्यालयाकडून सूचना दिल्या आहेत. बाजार समिती प्रशासन यामध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कामगारांनी त्यांच्या कामाचा मोबदला माथाडी बोर्डात भरावा, अडत व्यापाऱ्याकडून रोखीने व्यवहार करू नये. वास्तविक पाहता राज्यामध्ये हमाली १ रुपया ५० पैसे इतकी असताना , सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली १ रुपया ९० पैसे इतकी आहे.
– दत्तात्रेय सूर्यवंशी , सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
* हमालीचे टप्पे *
१ ते १० किलोसाठी – ३८ पैसे
११ ते ३० किलोसाठी – १.रू. १४ पैसे
३१ ते ५० किलोसाठी – १. रु. ९० पैसे
कामगारांना पाहिजे सरसकट हमाली – १.रू.९० पैसे
कामबंद करत निदर्शने देऊन नोंदवला निषेध..
शासन आणि प्रशासन कामगारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलन सुरू करून अनेक दिवस उलटले तरी देखील यावर निर्णय होत नसल्याने , शेवटी कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार ( दी. १० ) सप्टेंबर रोजी सकाळपासून कांदा विभाग , भुसार – आडत विभाग , आणि फळ विभागातील सुमारे दोन हजार कामगार आपले कामबंद ठेवले आहेत. केवळ अत्यावश्यक असणारे भाजीपाला विभाग सुरू ठेवण्यात आला होता.
– भिमा सिताफळे, उपाध्यक्ष कामगार समन्वय समिती सोलापूर.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
१) भुसार बाजाराकरीता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे.
२) संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाईचा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे.
३) माथाडी कामगाराकरीता घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे.
४) कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करु नये.
Leave a Reply