मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची अलोट गर्दी
मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेली आहे आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागतो आहे
Leave a Reply