एअरपोर्टवरुन किडनॅप केले, बारा तास बांधून ठेवले, एक कोटीची मागणी केली अन्…

एअरपोर्टवरुन किडनॅप केले, बारा तास बांधून ठेवले, एक कोटीची मागणी केली अन्…

बॉलिवूड अभिनेता मुस्ताक खानचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अपहरणकर्त्यांनी मुस्ताक खानला बिजनौरमध्ये औलीस ठेवले होते. तसेच अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून मुस्ताक यांच्या मोबाईलवरून दोन लाख रूपये देखील ऑनलाइन ट्रान्सफर केले. याप्रकरणी अभिनेत्याच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठमधील बिजनौर कोतवाली नगर येथील तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहे.
खानच्या इव्हेंट मॅनेजरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल सैनी नावाच्या व्यक्तीने मेरठ येथून फोन केला होता. ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात मुस्ताक यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान करण्यात यावा, असे राहुल सैनीने फोनवर म्हटले होते. या कार्यक्रमासाठी राहुल सैनीने पैसे देखील दिले होते आणि 20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक देखील करण्यात आले होते. 20 नोव्हेंबर रोजी सैनीने मुस्ताक यांना दिल्ली विमानतळावरून एक कॅबने रिसिव्ह केले. या कॅबहुन मुस्ताक मेरठला जाणार होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुस्ताक यांना दिल्ली विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर दुसऱ्या कारमध्ये बसवले. या कारमध्ये आणखी दोन जण बसले होते. ज्यांना पाहून मुस्ताकने कारमध्ये बसण्यास नकार दिला. मात्र त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि त्यांना थेट बिजनौरला आणले. अपहरणकर्त्यांनी मुस्ताकला बिजनौरच्या मोहल्ला चाहशिरी येथील घरात ओलीस ठेवले होते. आरोपी दारूच्या नशेत असताना मुस्ताक यांनी शांतपणे दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन मशिदीत पोहोचले. तेथून त्यांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
मुस्ताकला जेव्हा ओलीस ठेवण्यात आले होते, तेव्हा अपहरणकर्त्यांनी एक कोटींची खंडणी मागितली. तसेच मुस्ताकचा मोबाइल फोन घेऊन सुमारे दोन लाख रुपये एका खात्यात ट्रान्सफर केले होते. या प्रकरणात एसपी अभिषेक झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताकच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठचा रहिवासी सैनी नावाच्या व्यक्तीविरुद्ध अपहरण, ओलीस ठेवणे आणि खंडणीची मागणी आणि खूनाचा प्रयत्न करणे या कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *