दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे 11मे पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे श्री नरसिंह जयंती ते संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन हे सप्ताहाचे 9 वर्ष आहे.
या सप्तहाचे व्यासपीठ चालक हभप पंकज महाजन गुंड हभप विजय साळुंखे महाराज
या सप्ताहाची सुरुवात रविवार दिनांक 11मे 2025रोजी सकाळी कलश पुजन ध्वज पुजन मृदंग पुजन विणा पुजन, ग्रंथ पुजन हे सर्व महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे 5 ते 7 काकडा आरती ,7ते9 ज्ञानेश्वरी पारायण,10ते12गाथा भजन,दुपारी 2 ते 4 संगीत भजन,सायंकाळी 6ते 7प्रवचन,रात्री 8ते 10 हरि किर्तन नंतर रात्रभर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
रविवार दिनांक 11मे 2025रोजी अखील भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे यांच्या हरी किर्तनाने सप्तहाची सुरुवात झाली.
तसेच उळे येथील हभप मन्मथ बहिरमल महाराज, सोलापूर चे हभप माऊली बचुटे महाराज, उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील बाल किर्तनकार हभप शंभुराजे गुंड महाराज उत्तर सोलापूर तालुक्यातील
वडाळा चे हभप रामहरी शेंडगे महाराज सोलापूर चे अखील भाविक वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष हभप संजय पाटील महाराज यांचे सलग सात दिवस हरि किर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.
17मे 2025रोजी अखील भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर इंगळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्तहाची सांगता होणार आहे.
सलग सात दिवसाची किर्तन रुपी सेवा हभप सचिन गायकवाड यांची असून काल्याच्या किर्तन रूपी सेवा ही समसापुरचे दिपक पाटील यांची आहे.
तसेच सप्ताहाची सुरुवात झाल्यापासून गुंजेगाव चे हभप प्रदीप पवार, गावडेवाडी चे हभप नागनाथ कोळेकर महाराज, बार्शी चे हभप सागर क्षिरसागर महाराज, अकोले मंद्रूप चे हभप रामलिंग भगरे, मनगोळी गावचे हभप किसन खांडेकर डोणगाव चे हभप कुमारी प्रगती गुंड महाराज यांचे या ठिकाणी प्रवचन होणार असुन सर्वच प्रवचन सेवा ही मधुकर कांबळे यांची आहे.
सकाळचे अन्नदाते विशाल चव्हाण रमेश आण्णा कापसे, नवनाथ चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण बलभीम चव्हाण, गोरख चव्हाण यांची असून संध्याकाळची पंगत दत्तात्रय घुले,कै.शैलाताई आंबुळे यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब आंबुळे, सुरेश वाघमोडे, सचिन कांबळे, बाळासाहेब इंगळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सुरेश हसापुरे यांची आहे
17मे 2025रोजी काल्याच्या कीर्तना दिवसी शालीवाहन माने यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सलग सात दिवस सकाळ चा चहा व नाश्ता मच्छिंद्र चव्हाण यांची आहे.
हा सप्ताहास वीणेकरी,मृंदगाचार्य गायनाचार्य ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व्यवस्थापक काकडा प्रमुख, हार्मोनियम, पुष्पहार सेवा फळ सेवा हरि जागर व्यवस्थापक चोपदार,मंडप स्प्पिकर पिण्याच्या पाण्याची सेवा भोजन व्यवस्था हरि जागर सेवा यांच्यासह पाथरी गुंजेगाव तेलगाव सीना अंत्रोळी येळेगाव मंद्रूप कवठे डोणगाव गावडेवाडी नंदुर अकोले मंद्रूप भंजनी मंद्रूप पोलीस ठाणे आणि समस्त पांडुरंग भजनी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply