169 भायतीयांसह 53 इग्लैंडच्या नागरीकांचा होरपळून मृत्यू,  विमान अपघातात सर्वच 242 नागरीकांचा मृत्यु

169 भायतीयांसह 53 इग्लैंडच्या नागरीकांचा होरपळून मृत्यू,  विमान अपघातात सर्वच 242 नागरीकांचा मृत्यु

गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात आज दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 इंग्लंडचे नागरिक, 12 क्रु मेंबर्स, सात पोर्तुगालचे तर एक कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएडेट प्रेसला दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे, असे देखील आयुक्त मलिक म्हणाले.
माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ड्रीमलाइनर विमानने टेकऑफ केल्यानंतर लगेच कोसळला. याच विमानामध्ये कृ मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *