दक्षिण सोलापूर आचेगाव येथील शावरसिध्द शाळेच्या भोंगळ कारभार आला समोर.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील श्री शावरसिध्द हायस्कूल चा भोंगळ कारभार आला समोर.भीम छावा कामगार संघटनेकडून सोलापूर जिल्हा परिषद समोरील पुनम गेट समोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले.
आचेगाव येथील श्री शावरसिध्द हायस्कूल येथे कै अर्जुन महादेव गोतसुर्व हे सह शिक्षक पदावर कार्यरत होते
अर्जुन महादेव गोतसुर्व हे सेवेवर कार्यरत असताना दिनांक 28डिसेंबर 2016 रोजी निधन झाले
अर्जुन महादेव गोतसुर्व यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा मुलगा विद्यासागर गोतसुर्व यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी घेण्यासाठी श्री शावरसिध्द हायस्कूल आचेगाव या शैक्षणिक संस्थेकडे मागील आठ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे
आहेत परंतु शैक्षणिक संस्थेकडुन त्यांच्या रास्त असलेल्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे
त्यामुळे गोतसुर्व नातेवाईक आणि भीम छावा कामगार संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले
यावेळेस गोतसुर्वे परिवारातील सदस्य मंडळी भीम छावा संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
Leave a Reply