सैफुल येथे ‘आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे’ जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन, युवराज राठोड यांचे केले कौतुक…
सैफुल येथे डॉ. योगेश राठोड व डॉ. शीतल पवार-राठोड यांनी नव्याने सुरू केलेल्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास उद्घाटन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री जुगनू महाराज, विजयपूरचे देवानंद चव्हाण, डॉ. योगेश राठोड, डॉ. शीतल पवार- राठोड, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. चन्नप्पा पवार, सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, सरपंच विजय राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतूबर, तालुका प्रमुख संदीप राठोड, महाराष्ट्र वसतिगृह महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी नगराध्यक्ष लाला राठोड, मोतीराम चव्हाण, नाम पवार, पिंटू चव्हाण, भीमराव राठोड, अनिता राठोड, मीनाक्षी राठोड यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, डॉ. योगेश राठोड व डॉ. शीतल पवार- राठोड यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा केली आहे. ते सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवा करीत आहेत. या आधार हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असून त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. आलेला रुग्ण हा तंदुरुस्त होऊन आरोग्यदायी जीवन जगेल, यात शंका नाही. तसेच सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड हे आपले बंधू, परिवार आणि या हॉस्पिटलसाठी मोठे ‘आधार’ असल्याचे गौरवोद्गार मंत्री संजय राठोड यांनी बोलताना काढले. आधार हॉस्पिटलने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजना या पुढील काळातही राबवाव्यात. शासनाकडून काही मदत लागल्यास आपण तत्पर आहोत , अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
Leave a Reply